नवी मुंबई : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचे काम करणाऱ्या दोनजणांवर लाच लुचपत विभागाने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई केली आहे. या दोघांनी परिवहन कार्यालयात काम करत असल्याचे भासवत फिर्यादी यांच्याकडून १ हजाराची लाच स्वीकारली असताना रंगेहात त्यांना पकडण्यात आले आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार यांना काही महिन्यांपूर्वी वाहन चालविण्यातील चुकीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करीत दंड आकारात वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला होता. त्यांनी ऑनलाइन दंड भरला, मात्र ही आकारलेली पावती देण्याकरीता तसेच तक्रारदार यांचे वाहन चालवणाचा परवाना सोडवून देण्याकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथील खिडकी क्रमांक २८ मधील दोन कर्मचाऱ्यांनी २ हजारांची लाच मागितली होती. तडजोडी अंती १ हजार रुपयात पूर्ण व्यवहार ठरला. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाशी संपर्क करीत आपली कैफियत मंडली . त्यांच्या तक्रारीची शहानिशा करीत आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. यात लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.

हेही वाचा – रायगड : ..आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला; माणसं नव्हे श्वान असल्याचे उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुहास जाधव व शरद कांबळे असे त्यांची नावे आहेत. मात्र कारवाईनंतर सदर दोन कर्मचारी हे खाजगी दलाल असल्याचे समोर आल्याने नवी मुंबई युनीटचे पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या पथकाने त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ (अ) प्रमाणे (एखाद्या कामासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा स्वतःसाठी बेकायदा पद्धतीने पैसे स्वीकारणे)  कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे  यांनी दिली.