शहरातील नगरपरिषदेच्या मासळी बाजाराची दुरावस्था झाली आहे. बाजाराचे छत कोसळ्याच्या स्थितीत असल्यामुळे मच्छिमार व्यापाऱ्यांच्या तसेच मासळी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या जीवाला ही धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा- उरण रेल्वे स्थानकाच्या कामाला वेग; छप्पर टाकण्याचे काम रात्रंदिवस सुरू

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

उरण शहरातील कोटनाका येथील उरण नगरपरिषदेच्या मासळी बाजाराच्या छताचे प्लास्टर गळू लागले आहे. तसेच बाजारातील फरश्या उखडल्या आहेत. आणि धोकादायक म्हणजे बाजाराच्या इमारतीला वीज पुरवठा करणाऱ्या विजेच्या बोर्डाच्या तारा लोंबकळू लागल्या आहेत. त्यामुळे विजेचा धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बाजारात मासळी विक्रीसाठी बसणाऱ्या महिलांना स्वछतागृह उपलब्ध नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तसेच बाजराच्या समोरील आवारात सकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान घाऊक मासळी विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र कालावधीत नंतरही त्यांची मासळी विक्री सुरू रहात असल्याने बाजारातील मासळी विक्रीवर परिणाम होत असल्याचे येथील मासळी विक्रेत्यांची तक्रार आहे.

हेही वाचा- नव्या वर्षात नवी मुंबईकर होणार आणखी सुरक्षित; शहरावर १६०५ नव्या सीसीटीव्हींची करडी नजर

या संदर्भात उरण कोळीवाडा येथील बापूजीदेव मच्छिमार संस्थेने उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना निवेदन दिले आहे. यामध्ये नगरपरिषदेने मदत करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.