फिरत्या वाहनांवर बंदी असल्याने नवी शक्कल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महानगरपालिकेनेफिरत्या वाहनांवरून जाहिरातबाजी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता जाहिरातदारांनी नवी शक्कल लढविली असून सायकलचा वापर सुरू केला आहे. सायकलला जाहिरात डिसप्ले करून ती शहरात फिरवली जात आहे.

यापूर्वी छोटय़ा-मोठय़ा वाहनांवर हायड्रॉलीक जॅकद्वारे मोठे फलक लावून जाहिरात केली जात असते. २०१६ पासून पालिकेने अशी जाहरातबाजी करण्यास बंदी घातली आहे. परवाना विभागातून केवळ जाहिरात फलकावर जाहिरात करण्याची परवानगी दिली जात आहे. असे असताना आता शहरात सायकवरून जाहिरातबाजी केली जात आहे. तीन चाकी सायकलवर जहिरात फलक बनवून ती सायकल दिवसभर शहराच्या विविध भागांत फिरविली जाते. यासाठी अस्थापनेला विशिष्ट किंमत मोजावी लागते तर सायकल चालविणाऱ्याला रोजंदारीवर तासागणिक पैसे दिले जात आहेत.

जाहिरातदारांना दिवसाला १००० ते १२०० रूपये तर सायकल चालकाला ८ तासाठी ५०० रुपये देत विनापरवाना जाहिरात करून पालिकेचा महसूल बुडवत आहे. महापालिका केवळ उपलब्ध करून देण्यात आलेल्या फलकांवर जाहिरात करण्यास परवानगी देत असते. फिरत्या वाहनांवरील जाहिरातीला बंदी आहे. शहरात असे होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.   – प्रकाश वाघमारे, सहा.आयुक्त परवाना विभाग, नवी मुंबई महानगरपालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bicycling use for advertising
First published on: 02-05-2019 at 01:20 IST