लोकसत्ता टीम

पनवेल : मुंबई ते उरण या मार्गावरील अटलसेतू पुलाने प्रवास करत असताना अटलसेतूवरील टोलनाका कर्मचाऱ्याला उद्धट बोलल्यास थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊ शकतो. बुधवारी दुपारी पावणेबारा वाजता टोलनाक्यावरील एका महिला कर्मचाऱ्याला शिविगाळ व दमदाटी केल्याने एका मोटार चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

आणखी वाचा-शिक्षकांच्या गणवेशासाठी मतदान, नवी मुंबई महापालिका शिक्षकांची प्रक्रियेला सुरुवात

अटलसेतूवरुन ४९ वर्षीय हारुण पटेल हे मोटार चालवित असताना अटलसेतू येथील टोलनाक्यावर हर्षदा कोळी या पथकर जमा करण्याचे काम करत असताना ही घटना घडली. हारुण यांनी मोटार न थांबवल्याने त्यांच्या गाडीच्या पुढील बाजूवर बूमबॅरीअर पडले. यामुळे संतापलेल्या हारुण यांनी हर्षदा यांना शिविगाळ व दमदाटी केल्याची तक्रार न्हावाशेवा पोलीसांत हर्षदा यांनी केली.