चिनी मातीच्या पणत्यांची मागणी घटली; विविध आकाराच्या कंदिलांना ग्राहकांची पसंती
दिवाळीचे वेध लागताच बाजारात, चौकांत, फुटपाथवार, हातगाडय़ांवर पणत्या, दिवे, आकाशकंदील दिसू लागले आहेत. यंदा ग्राहकांची चिनी मातीपासून बनवल्या जाणाऱ्या दिव्यांना असलेली पसंती कमी झाली असून मातीच्या दिव्यांची मागणी वाढली आहे.
बाजारात स्वस्तिक, होडी, कमळ, फुलपाखरू, लक्ष्मी देवीची छबी, पाण्याच्या आकाराच्या विविध प्रकारच्या पणत्या पाहायला मिळत आहेत. यात स्वस्तिक पणत्यांना जास्त मागणी आहे. चिनी मातीपासून बनवलेल्या पणत्यांना कमी मागणी असली तरी त्या बाजारात उपलब्ध आहेत. हा माल गुजरात येथून मागवला असल्याची माहिती ऐरोलीतील विक्रेते शिवशंकर यांनी सांगितले. ५ रुपयांपासून सुरू झालेली पणती आकार व नक्षीनुसार १२० रुपयांपर्यंत मिळत आहे. रेडीमेड वॅक्स दिवेही बाजारात उपलब्ध आहेत. यात गोलाकार, चौकोनी, बदामी आकाराचे, स्वस्तिक आकाराचे दिवे उपलब्ध आहेत. तर १० रुपयांपासून ते ५००-६०० रुपयांपर्यंत आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत. चांदणीच्या आकाराचे, गोलाकार, षटकोनी, मटक्याच्या आकाराचे कंदील उपलब्ध आहेत. त्यातही कमळाच्या आकाराच्या कंदिलांना गृहिणींची पसंती मिळत आहे. सजावटीसाठी असलेल्या माळांमध्येही विविध नक्षी आहेत.
पणती
* साधी पणती- १० रु.
* स्वस्तिक पणती- ५ रु.
* होडी पणती- ५ रु.
* कमल पणती- ५ रु.
* तितली पणती- ५ रु.
* लक्ष्मी देवीची छबी असलेली पणती- २५ रु.
* आंबा पान पणती- १२० रु.
* ९ दिव्यांची पणती- ९० रु.
* तीनपानी पणती- ८० रु.
दिवे
* फोम शेप २० ते ५० रु.
* एलईडी दिवे- ४०० रु.
वॅक्स दिवे
* गोलाकार, बदामी व स्वस्तिक
* आकार प्रत्येक पणती- १० रु.
* माळा- २० रुपयांपासून सुरुवात
* रिबन हार्ट शेप- ४०-५० रु.
* चांदणी आकार- ५० रु.
* जरी असलेले ओम, स्वस्तिक आकार- ६० रु.
कंदील
* कमळ आकार- ३५०-४०० रु .
* चांदणी आकार- ८०-९० रु .
* गोलाकार- ८०-९० रु.
* षटकोनी – ७०-३५० रु.
* मटक्याचा आकार – १५० रु.