लोकसत्ता टीम

पनवेल: नवी मुंबई येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात सहाजणांनी बनावट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन दिड तासात ३४ लाख रुपये लुटण्याची घटना नवी मुंबईतील ऐरोली येथे घडली आहे. ही घटना २१ जुलैला घडली असली तरी सोमवारी याबाबतची तक्रार पिडीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याने पोलिसांना दिली. याबाबत नवी मुंबईचे पोलीस तपास करीत आहेत.

आणखी वाचा-नवी मुंबईकरांची पाणीचिंता मिटली; मोरबे धरणात १३ मार्च २०२४ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईतील ऐरोली नोडमधील सेक्टर ६ येथील साईराज इमारतीमध्ये कांतिलाल यादव यांच्या घरात ही घटना २१ जुलैला दुपारी साडेतीन ते पाच वाजता घडली. सहा जणांनी घरात येऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस असून घरझडती घ्यायची असल्याचे सांगून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन तेथून पसार झाले.