नवी मुंबई : करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या कमी जास्त प्रमाणात आढळत होती. मात्र करोना मृत्यू होत नव्हते. जवळपास चार महिने नवी मुंबईला हा मोठा दिलासा होता. मात्र बुधवारी व गुरुवारी सलग दोन दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत करोनाबाधित झाले असूनयापैकी २०४८ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र २६ फेब्रुवारीनंतर एकही मृत्यू झाला नव्हता. आता यात दोन मृत्यूंची भर पडत करोना मृत्यूंची संख्या २०५० इतकी झाली आहे. त्यामुळ नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

नवी मुंबईत तिसरी लाट ओसरल्यानंतर चार महिने शहरातील परिस्थिती अत्यंत नियंत्रणात होती. मात्र गेले काही दिवस शहरात रुग्णवाढ सुरू आहे. एक अंकी असलेली रुग्णसंख्या वाढत आता साडेतीनशेपर्यंत गेली आहे. रुग्णवाढ चिंताजनक असली तर या लाटेत अतिदक्षता रुग्णांचे प्रमाण हे अत्यल्प होते. प्राणवायूची गरज लागत नव्हती. तर रुग्णवाढीनंतर एकही करोना मृत्यू झाला नव्हता. हा शहराला मोठा दिलासा होता. मात्र बुधवारी एक व गुरुवारी एक जणाचा मृत्यू झाला आहे.

कोट

नवी मुंबई शहरात जवळजवळ मागील चार महिन्यांनंतर करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णसंख्या ३०० च्या पुढे गेली असली तरी परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आहे.-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका