नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथील खाडी किनारी एक मृतदेह आढळला होता. अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील हा मृतदेह कांदळवनात अडकलेल्या अवस्थेत होता. तो बाहेर काढण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वाशी खाडी किनाऱ्याला असलेल्या कांदळवनात दोन दिवसांपूर्वी एक मृतदेह अडकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांनी वाशी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तात्काळ स्थानिक मच्छिमार  महेश सुतार व त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या अंगावर राखाडी रंगाची पँट आहे. याशिवाय कुठलीच ओळख पटेल असे काहीही कागदपत्र किंवा अन्य वस्तू आढळून आल्या नाहीत.

हेही वाचा – नवी मुंबई : आर्थिक विकास महामंडळाची मागणी करत प्रकल्पग्रस्त मुख्यमंत्र्यांचे मानणार आभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून भरतीसोबत वाहून आला असावा, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.