नवी मुंबई: रमजान निमित्त बाजारात फळांना मागणी

रमजान ईद निमित्त फळांना अधिक मागणी असल्याने फळांची आवकही वाढत आहे

fruits
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता टीम

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी बाजारात रमजान ईद निमित्त फळांना अधिक मागणी असल्याने फळांची आवकही वाढत आहे. विशेषतः कलिंगड़ , आंबा, पपई, खरबूज यांना जास्त मागणी असते.

रमजान सनानिमित्त बाजारपेठेत उलाढाल वाढली असून, फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे़. उपवास (रोजा) सोडण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी करत असून, बाजारपेठेत रेलचेल आहे़. गेल्या काही दिवसांपासून फळांची आवक वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. मागणी वाढल्याने फळ बाजारात सर्व फळांमध्ये कलिंगडची जास्त आवक झाली आहे.

आणखी वाचा- बाजारात भाज्यांची दरवाढ

कलिंगड, खरबूज, पपईच्या १००गाड्या दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपासून ५०गाड्या अधिक दाखल होत आहेत. हापूस ३७४६क्विंटल , इतर आंबा ६०१०क्विंटल दाखल झाले आहे. कलिंगड ८०५०क्विंटल आवक असून प्रति क्विंटल ६००-१२००रुपये , द्राक्ष १०८१ क्विंटल दाखल झाले असून ३५००-५५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहेत. पपई १९७४ क्विंटल आवक असून प्रति क्विंटल १५००-३०००रुपये तर खरबूज २६३५क्विंटल दाखल झाले असून झाली २०००-२४००रुपये दर आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 18:29 IST
Next Story
नवी मुंबई: महापालिका शाळांतील ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिला जलबचतीचा संदेश
Exit mobile version