पनवेल : नेहमीच गजबजलेल्या पनवेल तहसील कार्यालयात तीन तहसीलदारांव्यतिरिक्त एकही कर्मचारी मंगळवारी उपस्थित नव्हता. कर्मचारी संपात सामिल झाल्याने पनवेलमधील विविध सरकारी कार्यालयांची अशीच परिस्थिती होती. यामध्ये वन विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येत संपात सामिल झाले होते. तहसील कार्यालयात कर्मचारी नसल्याने विविध दाखल्यांसाठी आलेल्या सामान्यांना परत घरी परत जावे लागले.
हेही वाचा – नवी मुंबई : कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने आरटीओचे कामकाज ठप्प
हेही वाचा – नवी मुंबई : कोकण भवन संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा; मनपात काळी फित लाऊन कामकाज
राज्य कर्मऱ्यांनी मंगळवारी पुकारलेल्या संपात पनवेलच्या महसूल विभागातील शंभर टक्के कर्मचारी सामिल झाल्याने कचेरीतील कामकाज पूर्णपणे ठप्प होते. पनवेल महापालिकेतील कर्मचारी संपापासून दूर होते, तर राज्यव्यापी बेमुदत संपात महसुली कर्मचारी मोठ्या प्रमाणात सामिल झाल्याने पनवेल शहरातील तलाठी कार्यालयाचे दार कुलूपबंद होते. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारीका संपात सामिल झाल्या नव्हत्या त्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा रुग्णालयाच्यावतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. पनवेलच्या महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दुपारी दिले.