नवी मुंबई : जुनी निवृत्ती योजना लागू करावी या मागणीसाठी पुकारलेल्या संपाचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबईतील कोकण भवन येथील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात थेट सहभागी न होता संपाला पाठींबा म्हणून काळ्या फिती लाऊन कामकाज केले.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. १७ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होती असे सांगण्यात आले होते. नवी मुंबईत मिनी मंत्रालय म्हटले जाणाऱ्या कोकण भवनातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. सकाळी साडेदहा आकाराच्या सुमारास घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी २८ विभागांतील सुमारे २ ते अडीच हजार कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता. कोकण भवनमधील संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला.  

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

हेही वाचा – नवी मुंबई : कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने आरटीओचे कामकाज ठप्प

कोकण भवनातील सर्व विभागांतील जुनी पेन्शन हक्क समितीतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम बंद बेमुदत संपात सहभागी झाले होते. आमचे काही टक्के पैसे कापले जातात ते परत मिळण्याची शाश्वती नाही, ३०/३५ वर्ष सेवा केल्यानंतर आम्ही काय करावे, आमदार खासदारांना निवृत्ती वेतन मिळते, आम्हाला का नाही? अशी माहिती बृन्हमुंबई राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस मोरेश्वर चौधरी यांनी दिली. बृन्हमुंबई राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस मोरेश्वर चौधरी, उपाध्यक्ष अस्मिता जोशी, महिला संघटक मंगला कुलकर्णी, जुनी पेन्शन हक्क समिती कोंकण विभागाच्या अध्यक्ष श्रीमती वंदना कोचुरे, कार्याध्यक्ष माधुरी डोंगरे, उपाध्यक्षा अश्विनी धुमाळ, सचिव अजित न्यायनिरगुने, आदींनी सहभाग घेतला होता. संपामुळे कोकण भवनात येणाऱ्या अभ्यागताची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

हेी वाचा – नवी मुंबई : कटरचा धाक दाखवून चोरी; अंगावरील जॅकेटसह चीज वस्तू घेऊन फरार

आजपासूनच प्रारूप विकास आराखड्याची सुनावणी नवी मुंबई  महानगर पालिकेत सुरू होती. त्यामुळे ७५४ नागरिकांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. संपात मनपा कर्मचारी सामील झाले तर सुनावणी होईल की नाही, असा प्रश्न होती. मात्र मनपा कर्मचाऱ्यांनी काळी फित लाऊन संपला पाठींबा दिला. प्रत्यक्ष काम बंद करून सहभागी न झाल्याने सुनावणी पार पडली. तसेच मुख्यालय आणि विभाग कार्यालयात नियामित कामकाज सुरळीत पार पडले.