मरिना प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी

मेरिटाइम बोर्डाने तयार केलेल्या प्रस्तावास केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयाने मान्यता दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांचा दावा; मुंबईपर्यंतच्या जलसेवेसह करमणूक, पर्यटन केंद्राचा विकास

नवी मुंबई : मुंबईतील भाऊचा धक्का, मांडवा, करंजा, एलिफंटा या ठिकाणांना जोडणाऱ्या जलवाहतुकीसह पर्यटन आणि करमणुकीचे केंद्र ठरणाऱ्या  नवी मुंबईतील मरिना प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभागाने परवानगी दिल्याची माहिती बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवारी दिली. म्हात्रे यांच्या मतदारसंघात सीबीडी सेक्टर-१५ येथील भूखंडावर सात एकरहून अधिक जागेवर हा प्रकल्प उभा राहाणार असून त्याद्वारे नवी मुंबईत पर्यटनाचे नवे आकर्षण केंद्र निर्माण होईल, असा दावा म्हात्रे यांनी केला.

सीबीडी-बेलापूर सेक्टर-१५ येथील भूखंड क्र. १११अ येथे अंदाजित क्षेत्रफळ ७.२५ एकर जागेचा ताबा सिडकोने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाला काही अटी व शर्तीवर मरिना प्रकल्पास देण्यात आला आहे. मेरिटाइम बोर्डाने तयार केलेल्या प्रस्तावास केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयाने मान्यता दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या प्रकल्पाचे काम मे. स्वस्तिक इन्फ्रा लॉजिक प्रा. लि. या कंपनीस देण्यात आले असून कंपनीने प्रकल्प अहवाल तयार करून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे सादर केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ३० प्रवासी बोटींसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार असून वेटिंग रूम, पार्किंग, अ‍ॅम्पी थिएटर, गार्डन, जॉगिंग ट्रॅक सुविधांबरोबरच करमणूक व मनोरंजनकरिता असणाऱ्या मोठय़ा बोटीचीही सुविधा मरिना प्रकल्पामध्ये करता येणार असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामांकरिता अंदाजे १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नियोजित मरिना प्रकल्पाच्या बाजूलाच ८ कोटी रुपये खर्चाचे बेलापूर जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. सदर जेट्टीच्या माध्यमातून भाऊचा धक्का, मांडवा, एलिफंटा, करंजा अशा प्रवासी बोटींच्या फेऱ्या होणार आहेत. हा देशातील दुसरा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प असल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Department of environment approves marina project ssh

Next Story
‘एपीएमसी’च्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती?
ताज्या बातम्या