कळंबोली येथील लोखंड बाजारात गुरुवारी अवजड वाहनांच्या प्रवेशासाठी शुल्क देण्याची अट बाजार समितीने घातली आहे. मात्र प्रवेशशुल्काची पावतीवरुन झालेल्या वादात वाहतूकदाराने वसूली कर्मचारी व पर्यवेक्षकाला मारहाण केली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी प्रतिक म्हात्रे हा पर्यवेक्षक सध्या कळंबोली येथील सत्यम रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार घेत आहे. कळंबोली पोलीसांनी या प्रकरणी मारहाण करणा-या दोघांना तातडीने अटक केली.

हेही वाचा >>>नवी मुंबई: मोरा बंदरातील गाळामुळे जलप्रवासात खोळंबा; प्रवाशांकडून संताप व्यक्त

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

कळंबोली येथील लोखंड बाजारात गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सूमारास अवजड वाहनाचा चालक प्रवेश शुल्क न देता जात असल्याने संदीप मिश्रा या पथकर वसूली कर्मचा-याने या वाहनाला अडवले. मात्र तेथे अवजड वाहनाच्या चालकाने त्याच्या व्यवस्थापक व मालक तेथे बोलावले. त्याठिकाणी सूरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर कर्मचारी संदीपला संशयीत आरोपींनी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर संदीपला कळंबोली येथील सत्यम रुग्णालयात रोशन उलवेकर व प्रतिक म्हात्रे हे घेऊन जात असताना पुन्हा जखमीचा पाठलाग चारचाकी वाहनाने करुन सत्यम रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर दांडक्याने प्रतिकच्या डोक्यात मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात प्रतिक पडला. या दरम्यान कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पाटील व सहाय्यक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील हे पथकरवसूली नाक्यावरील मारेक-याचा शोध घेत होते. पोलीसांनी या प्रकरणी मारहाण करुन पळताना ४० वर्षीय फीरोज ताहीर हुसेन आलम आणि ३८ वर्षीय फीरदोष ताहीर हुसेन आलम यांना रंगेहाथ अटक केली. पनवेल येथील न्यायालयासमोर फीरोज व फीरदोष या संशयीत आरोपींना पोलीसांनी शुक्रवारी हजर केले.