एनएमएमटीची डबल डेकर बससेवा लवकरच; नवी मुंबई परिवहनकडून चाचपणी, पालिका आयुक्तांकडून दुजोरा

नवी मुंबई : तोटय़ात असलेल्या नवी मंबई परिवहन उपक्रमाला बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक विद्युत बस घेण्यात येत आहेत. आता डबल डेकर विद्युत बस खरेदीची चाचपणी एनएमएमटीकडून सुरू आहे. याला पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही दुजोरा दिला आहे.  २० ते २५ डबल डेकर बस घेण्याचा विचार आहे. एनएमएमटीच्या सद्या ३७५ बस प्रवाशांना सेवा देत आहेत. यात डिझेलवरील २२५ बस तर १५० विद्युत बस प्रवाशी वाहतूक करीत आहेत.

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

डिझेल, पेट्रोलचे दर वाढत असल्याने नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. उपक्रमाला पालिकेच्या अनुदानावर आपला कारभार चालवावा लागत आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी काही ठोस पावले उचलली जात आहेत. वाशी येथील बस आगारावर आता बहुमजली वाणिज्य संकुल उभारण्याचे काम सुरू आहे. तर पुढील काळात इतर मोक्याच्या जागांवर याच धर्तीवर वाणिज्य संकुले उभारण्याचे नियोजन आहे. नुकत्याच झालेल्या परिवहनच्या अर्थसंकल्पात यावर भर देण्यात आला असून एनएमएमटीचे सक्षमीकरण करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

दुसरीकडे केंद्र सरकारच्या विद्युत धोरणाअंतर्गत फेम एक व फेम दोन अंतर्गत जास्तीत जास्त विद्युत बस घेण्यात येत आहेत. आतापर्यंत परिवहनाच्या ताफ्यात १८० विद्युत बस घेण्यात आल्या असून त्यातील १५० बस सेवा देत आहेत. आता आणखी विद्युत बस घेण्याचे नियोजन सुरू आहे. पुढील काळात ५० विद्युत बस नव्याने घेण्यात येणार आहेत. यात २० ते २५ डबल डेकर विद्युत बस घेण्याचे विचाराधीन आहे. या बस लांबच्या व अधिकची प्रवासी संख्या असलेल्या मार्गावर चालवल्यास इंधनापोटीचा खर्च वाचेल वा तिकिटांतून उत्पन्नात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेनेही नवीन डबल डेकर विद्युत बस खरेदीचा प्रस्ताव केला आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई पालिकेचा विचार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

प्रति किलोमीटर ११ रुपयांची बचत

डिझेल दरवाढीमुळे एनएमएमटी प्रशासनाच्या इंधन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्युत बस खरेदी करण्यात येत आहेत. डिझेलवरील बसला एका किलोमीटरला साधारण ६३ रुपये खर्च येतो तर विद्युत बसला हाच खर्च ५२ रुपये येत आहे. म्हणजे ११ रुपये प्रति किलोमीटर खर्च वाचत आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहनला सक्षम करण्यासाठी तसेच वाढती इंधन दरवाढ यामुळे पर्यावरणपूरक विद्युत बस खरेदी करण्यात येत आहेत. आणखी  पर्यावरणपूरक विद्युत बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये आता डबल डेकर बस घेण्याचे विचाराधीन आहे.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका