आधीच्या आयुक्तांची कामे पुढे नेणार!

डॉ. रामास्वामी म्हणाले की, तुकाराम मुंढे यांनी केलेली चांगली कामे पुढे नेण्यात येतील.

nmmc-chief
डॉ. रामास्वामी म्हणाले की, तुकाराम मुंढे यांनी केलेली चांगली कामे पुढे नेण्यात येतील

नवनियुक्त आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची ग्वाही

नवी मुंबई महापालिकेचे मावळते आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नवनियुक्त आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सोमवारी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी डॉ. रामास्वामी म्हणाले की, तुकाराम मुंढे यांनी केलेली चांगली कामे पुढे नेण्यात येतील. सर्वाना विश्वासात घेऊन काम करू. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ही नियुक्ती करण्यात आली आहे. पशुवैद्यक शास्त्रात पदव्युत्तर पदवीधर असणारे डॉ. रामास्वामी एन. हे २००४ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकारी आहेत.

[jwplayer aDOxuc39]

महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात एप्रिल २०१५ पासून महानिरीक्षकपदावर कार्यरत असणारे डॉ. रामास्वामी एन. यांनी यापूर्वी साहाय्यक जिल्हाधिकारी रत्नागिरी, साहाय्यक जिल्हाधिकारी चिपळूण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हाधिकारी सातारा या पदांवर काम केले आहे. साताऱ्यात जिल्हाधिकारी असताना माण, खटाव, फलटण तालुक्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारणासाठी हजाराहून अधिक बंधारे बांधल्याने दुष्काळापासून दिलासा मिळाला. म्हाडा – इमारत पुनर्रचना व दुरुस्ती विभागाचे मुख्य अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

[jwplayer WaLliReZ]

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dr ramaswami n took charge as the nmmc commissioner