कोपरी गाव व सेक्टर २६ अशा दोन्ही परिसरात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आजवर एकही नागरी आरोग्य केंद्र उभारले नाही. परिणामी येथील रहिवाशांना खासगी दवाखाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे. मात्र या खाजगी क्लिनिक मध्ये एका तपासणी साठी ३०० ते ४०० रू दर आकारला जात असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे रहिवाशांची होणारी आर्थिक लुटमार थांबावी म्हणून कोपरी गावात नागरी आरोग्य केंद्र उभारावे अशी मागणी कोपरी गाव ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील कापड कारखान्याला भीषण आग, कामगार आत अडकल्याची भीती

कोपरी गाव आणि से.२६ येथील नागरिकांना पावणे नागरी आरोग्य केंद्रात पायपीट करावी लागत आहे किंवा स्थानिक खाजगी दवाखाणा हा पर्याय असून त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे या दोन विभागाची जवळ जवळ २५-३०हजार लोकसंख्या आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या विभागात एकही नोकरी आरोग्य केंद्र उपलब्ध नाही. विभागातील २२हजार पर्यंत लोकसंख्या वस्ती असलेल्या भागाला एक नागरिक आरोग्य केंद्र असणे नियमात आहे. परंतु आजही नाही मुंबई शहरात नागरी आरोग्य केंद्रांची कमतरता आहे. कोपरी गावात ही तीच परिस्थिती असल्याने येथील गरीब गरजू नागरिकांना पाहुणे नागरी आरोग्य केंद्र गाठावी लागत आहे किंवा आर्थिक खर्च करून खाजगी मध्ये उपचार घ्यावे लागत आहे त्यामुळे या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारावे अशी मागणी ग्रावस्थांमधून होत आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील कापड कारखान्याला भीषण आग, कामगार आत अडकल्याची भीती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपरी गाव आणि सेक्टर २६ येथील नागरीकांना याठिकाणी नागरी आरोग्य केंद्र नसल्याने पावणे नागरी आरोग्य केंद्र गाठावे लागते. येथील स्थानिकांची नागरी केंद्र अभावी पायपीट होत आहे. त्यामुळे सांस्कृतिक भवनच्या पडीक जागेत नवी मुंबई महानगर पालिकेने नागरी आरोग्य केंद्र उभारावे.-परशुराम ठाकुर, अध्यक्ष, कोपरी गाव वेल्फेअर सोसायटी (ग्रामस्थ मंडळ)