नवी मुंबई : गुटखा सुंगधित सुपारी प्रमाणेच ई-सिगारेटलाही राज्यात बंदी आहे. बंदी असतानाही ई-सिगारेटचे (E cigarettes) व्यसन असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशांवर पोलिसांची वक्रदृष्टी पडली असून नवी मुंबईत केलेल्या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या १ लाख ६४ हजार २०० रुपयांच्या ई -सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेशकुमार मानिकचंद साहू (वय- ३२) आणि  मोह्हमद अर्शद सलीम शेख (वय ३३) असे यातील आरोपींची नावे आहेत. रविवारी दोन व्यक्ती विदेशी कंपनीच्या ई सिगारेट विक्री करण्यास येणार  असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे भूमी टॉवर नजीक खारघर सेक्टर ४ येथे सापळा लावण्यात आला होता.

हेही वाचा: नवी मुंबई: एमआयडीसीमधील चेंबर साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; तिसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरु

त्यात दोन्ही आरोपी अडकले. त्यांची अंगझडती घेतली असता राजकुमारकडे  वेगवेगळ्या कंपनींचे विविध फ्लेवरच्या ६३ ई सिगारेट आढळून आल्या. ज्याची किंमत ६३ हजार रुपये आहे. मोहम्मद याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीच्या सिगारेटचे २९ हजार १०० रुपयांचे ९७ सिगरेट पाकिटे आढळून आली. असे एकूण  १ लाख ६४ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर सय्यद यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E cigarettes worth one and a half lakh seized by police in navi mumbai tmb 01
First published on: 06-12-2022 at 13:47 IST