नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेचा वाहक सुनील पाटील याला बोगस तिकीटविक्री करताना पकडण्यात आले असून त्याच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरखरणेवरून उरणला जाणाऱ्या बसमध्ये सकाळी सहाच्या सुमारास ३१ नंबरच्या बसमधील प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी तिकीट तापसनीस ज्ञानेश्वर पाटील आले. तिकीट तपासत असताना तिकीट एनएमएमटीचे असले तरी ते बनावट असल्याची शंका त्यांना आली. अनुक्रमांक व महत्त्वाच्या बाबी तपासल्या असता तिकीट बनावट असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी याबाबत परिवहनच्या अधिकाऱ्यांना महिती दिली. त्यानंतर वाहक सुनील पाटील याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2015 रोजी प्रकाशित
बनावट तिकीट विक्रीप्रकरणी बसवाहकावर गुन्हा
त्यानंतर वाहक सुनील पाटील याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 31-10-2015 at 00:20 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake ticket made by conductor