लोकसत्ता टीम

पनवेल : सिडको महामंडळाच्या दक्षता विभागाने पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावाजवळ राडारोडा टाकणाऱ्या दोघांसह चार डंपरवर कारवाई केली आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाशेजारी मोठ्या प्रमाणात सिडकोच्या जमिनीत राडारोड्याचा भराव टाकण्याचे काम अवैधपणे केले जाते. मुंबई येथून राडारोडा आणून तो पनवेल परिसरात टाकणारी अनेक टोळ्या सक्रीय आहेत. सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा याबाबत रितसर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र या टोळीचे मूख्यसूत्रधाराला अद्याप पोलीसांनी पकडलेले नाही.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Recovery of installments on Shiv-Panvel highway bus drivers associations statement to Deputy Commissioner of Police
शीव-पनवेल महामार्गावर ‘हप्ते वसुली’, बस चालक संघटनेचे पोलीस उपायुक्तांना निवेदन
panvel cyber crime marathi news, panvel crime news
पनवेल : अधिकच्या परताव्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

राडारोड्यामुळे आरोग्यास धोका तसेच पर्यावरणास हानी होऊ शकते. त्यामुळे सिडको मंडळ मागील वर्षापासून या परिसरात राडारोडा टाकणाऱ्यांवर नियंत्रण आणत आहे. सिडको मंडळाच्या दक्षता विभागाचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली दक्षता विभाग, सिडकोचे सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय ठेऊन ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सिडको मंडळाने दिली.

आणखी वाचा-नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध

गुरुवारी दुपारी दोन वाजता सिडकोचे दक्षता पथक कुंडेवहाळ परिसरात फिरत असताना त्यांना दुपारी २ ते ४ वाजण्याच्या सूमारास  सर्व्हे क्रमांक ३७ येथे राडारोड्याने भरलेले चार डंपर खाली करुन जेसीबी व डोझरच्या सहाय्याने हा राडारोडा सपाटीकरणाची काम सुरु असल्याचे दिसले. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणाहून ३४ वर्षीय डंपर चालक बबलु यादव (कुर्ला मुंबई), ३९ वर्षीय राकेशकुमार सोनकर (मानखुर्द मुंबई) यांना डंपरसहीत ताब्यात घेतले. तसेच दोन डंपरवरील चालक आणि जेसीबी व डोझरचे ऑपरेटर येथून पळून गेले. याबाबतची रितसर तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाने सिडको क्षेत्रात विना परवानगी राडारोडा टाकणाऱ्यांची माहिती देण्यासाठी सिडकोच्या http://www.cidco.maharashrta.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.