उलवा येथे दोन सदनिकांच्या साठी लाखो रुपये घेऊन प्रत्यक्षात या सदनिका अन्य व्यक्तीला विकून फसवणूक केल्या प्रकरणी चार जणांना शिक्षा सुनावण्यात आली. नवी मुंबईत अनेक प्रकल्प आकार घेत असल्याने मालमत्ता खरेदी विक्रीतील फसवणूक घटनात वाढ होत आहे. मात्र अशाच एका प्रकरणात दोष सिद्धी होत चार जणांना २ वर्ष सश्रम कारावास आणि १५ हजार दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की काही वर्षांपूर्वी फिर्यादी रियाज सारंग यांना घर घ्यायचे होते त्यांनी शोध घेताना नुरी अश्रफ पावसकर, अश्रफ इद्रीस पावसकर कुसुम शाकीब मुकादम,शाकीब शेख अहमद मुकादम हे त्यांच्या संपर्कात आले.
हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी जबरी चोरीतील आरोपीला केले जेरबंद
या चौघांनी संगनमत करून सारंग यांना जसमीन अव्हेन्यू भूखंड ५६ सेक्टर २१ उलवा येथील सदनिका क्रमांक ६०१ आणि ६०२ या दाखवल्या. या सदनिका पसंत पडल्यावर या दोन सदनिका पोटी ३४ लाख ७० हजार रुपये चौघांना दिले. मात्र त्यांनी सदनिका ताब्यात देण्याचे टाळाटाळ केल्या. दरम्यान या सदनिका अन्य कोणाला तरी विकल्या असल्याचे समोर आल्याने सारंग यांनी वरील चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या ३ आरोपीना केले जेरबंद
हे प्रकरण न्यायालयात उभे राहिल्यावर आज (शनिवार). प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,१३ वे रे न्यायालय,बेलापूर यांनी यातील आरोपी नुरी अश्रफ पावसकर, अश्रफ इद्रीस पावसकर ,कुसुम शाकीब मुकादम,शाकीब शेख अहमद मुकादम यांची दोष सिद्धी झाली त्यांना दोन वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा दिली.व दंड न भरल्यास दोन महीने दिवस साधी कारावासाची शिक्षा देण्यात आली. आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केला आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. फाटके यांनी काम पाहिले तर कोर्ट कारकून म्हणून पोलीस नाईक प प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर आणि धीरज विलास सूर्यवंशी यांनी काम पाहिले.