नवी मुंबई: वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात भरविण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून स्टॉल धारकांना मुंबईसारखा प्रतिसाद नवी मुंबईत मिळाला नसला तरी विविध भागातून आलेल्या महिलांच्या चविष्ट पदार्थांचा नागरीकांनी चांगलाच आस्वाद लुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या विविध भागात लोकप्रिय असलेल्या पुरणापोळीचा आस्वाद अनेकांनी घेतला. शहरात होणाऱ्या पुरणपोळीपेक्षा खापरावरील तुपातील पोळीवर अनेकांनी ताव मारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव जागृती स्वयं सहाय्यता समुह  जिल्हा धुळे येथील कळंभीर साक्री येथील बचतगटाच्या स्टॉलवरील पुरणपोळीने चांगला भाव खाल्ल्याचे पाहायला मिळाले. खापरलावर भाजलेली भली मोठी पोळी व त्यावर  साजूक तुपाची भर यामुळे १०० रुपयाला एकपोळी असा दर असतानाही खवैत्यांनी मात्र या पुरणपोळीवर चांगलाच ताव मारल्याचे चित्र पाहाया मिळाले. या प्रदर्शनात जवळजवळ ५०० पेक्षा अधिक पोळ्यांची विक्री या महिलांनी केली असून विशेषतः ज्येष्ठ नागरीक असलेल्या येथील महिलांच्या त्रिकुटाचे सर्वच खवैय्यांनी कौतुक केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good income sale of puranpoli cidco exhibition at vashi center citizens good response ysh
First published on: 20-03-2023 at 19:46 IST