नवी मुंबई : उद्योगनगरी होण्याकडे झपाट्याने वाटचाल करणाऱ्या आणि स्वच्छ शहराचा मान मिळवलेल्या नवी मुंबईतील आयकर कॉलनी परिसरातील दृश्य या लौकिकाला साजेसे नसते. येथे उड्डाणपुलाखाली काही ग्रामस्थ अद्याप गाई व म्हशी सांभाळतात. या परिसरात सतत या जनावरांना चाऱ्यासाठी सोडले जाते. परिणामी पारसिकं हिलकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीला अडथळा होतो.
लोटस तलाव असलेल्या परिसरात सभोवती अगदी बोटावर मोजण्याएवढ्या गायी, गुरे सांभाळण्याचे काम काही मूळ ग्रामस्थ करतात. पण या परिसरात ही जनावरे चरत असतात. याच पारसिक हिलकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीला अडथळा होतो. कधी ही गुरे पारसिक हिलवरून येणाऱ्या उतारावर रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. याबाबत येथील स्थानिकांना विचारले असता गुरांना लोटस तलावाच्या परिसरात चरण्यासाठी सोडले जात असल्याची माहिती एका स्थानिकाने दिली.