वाशीतील एपीएमसी बाजारात हापूस निर्यातीला सुरुवात झाली असून १५% ते२०% हापूस निर्यात होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निर्यातीला उत्तम पद्धतीने सुरुवात झाली आहे. मागील वर्षी मार्चमध्ये हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याने  पाच ते दहा टक्के निर्यात झाली होती. चांगले असल्याचे मत एपीएमसी निर्यातदार यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा >>> गद्दार गेल्यानंतर शिवसेना आणखी मजबूत झाली; आमदार भास्कर जाधव आणि आंबदास दानवेंची मेळाव्याला दांडी

आखाती देशात, लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत याठिकणी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील हापूस आंब्याना जास्त प्रमाणात मागणी असते. एपीएमसी बाजारात एप्रिलपासून आंबा आवकीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होत असते. यंदा उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. परंतु हवामान बदलाने हापूसच्या तोडणी अधिक भर दिला जात आहे. एपीएमसी बाजारात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून देवगड, रायगड तसेच कर्नाटक येथून ११हजार पेट्या दाखल होत आहेत. एपीएमसी बाजारात मार्च एप्रिलपासून आंबा आवक मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते. होळीनंतर हापूस आंब्याची आवक आणखीन वाढणार आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिकेचे कचरा वाहतूक व संकलनासाठी वारंवार ठेकेदाराला मुदतवाढीची घंटा…..

आखाती देशात हापुस निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना नियमांच्या चौकटीतून आंबा निर्यात करावी लागते. आंबा निर्यातीकरीता आंब्याचा आकार, वजन, आणि दर्जा महत्वाचा असतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हापुस आंबा निर्यात करण्यासाठी त्याचा दर्जा टिकवून ठेवणे हे भूमिका महत्वाची असते. विविध प्रक्रिया करून, आंब्याची गुणवत्ता तपासणी करून ,विशिष्ट तापमान ठेवून दीर्घकाळ टिकण्यासाठी विविध प्रक्रियेतून हापुसला जावे लागते त्यांनतर हापूस आंबा निर्यातीसाठी सज्ज असतो. एपीएमसी बाजार समितीत आता हापूस आंबा आवक वाढत आहे. त्याचबरोबर आता निर्यात देखील चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सध्या हापूस निर्यातीत प्रति डझनाला २ हजार ५०० रुपये ते ३ हजार रुपये दर आहेत.

मागील वर्षी हापूस आंब्याच्या हंगामाला विलंब झाला होता. तसेच हवामान बदल ,अवकाळी पाऊस यामुळे दर्जावरही परिणाम झाला होता. गेल्या वर्षी पाच ते  दहा टक्के निर्यात सुरू झाली होती ,मात्र यंदा आतापर्यंत पंधरा ते वीस टक्के निर्यात होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धांत कराळे, आंबा निर्यातदार, एपीएमसी