उंदीर पकडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या दालनांत सापळे

२०० कोटींपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या राज्यातील सर्वात देखण्या मुख्यालयात सध्या मूषकराज सुरू आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या दालनात मूषक राज संपुष्टात आणण्यासाठी सापळे लावण्यात आले आहेत. खाडीकिनाऱ्याला खेटून असलेल्या या मुख्यालयातील एखादी खिडकी जरी उघडी राहिली तरी मुख्यालयात उंदीर घुसखोरी करतात. उघडय़ा  वायर आणि नस्ती कुरतडतात.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

स्वातंत्र्यपूर्व काळात बांधण्यात आलेल्या मुंबई महापालिकेच्या आर्कषक मुख्यालयानंतर राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेली इमारत ही नवी मुंबई महापालिका मुख्यालयाची आहे. पाम बीच मार्गावरील ही इमारत अनेकांच्या आर्कषणकेंद्र ठरली आहे. सिडकोकडून एक रुपया नाममात्र दराने घेण्यात आलेल्या या इमारतीच्या जमिनीवर सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून ही देशातील पहिली पर्यावरणस्नेही इमारत बांधण्यात आली.

बेलापूर येथील खाडीकिनारी बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या पश्चिमेस शेततळी आणि खारफुटीचे जंगल आहे. त्यामुळे इमारतीच्या आवारात उंदराचा सुळसुळाट वाढला आहे. इमारतीतील उपाहारगृहामुळे या उंदारांची चंगळच झाली आहे. २०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीत घुसणाऱ्या उंदरांचा मात्र बंदोबस्त करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या दालनात उंदीर पकडण्यासाठी सापळे लावण्यात आले आहेत. त्यात पावाचे तुकडे टाकूनही एकही उंदीर सापळ्यात सापडला नसल्याचे येथील अधिकारी आणि कर्मचारी सांगतात.

मुख्यालयातील उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेचा मूषक नियंत्रण विभाग जोरदार प्रयत्न करत आहे. हे मोठे उंदीर पकडताना सापळे निरुपयोगी ठरत आहेत. खाडीतील मूषकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पश्चिम बाजूला एक मोठी भिंत बांधण्यात यावी, अशी एक भन्नाट कल्पना या विभागाच्या वतीने मांडण्यात आली आहे. त्यामुळे उंदरांना भिंतीवर चढता येत नाही का, असा प्रश्न याच विभागातील काही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अधिकाऱ्यांची पंचाईत

* अधिकाऱ्यांना दालनाच्या खिडक्या बंद ठेवाव्या लागतात

* उघडय़ा  वायर आणि नस्ती कुरतडतात

* मुख्यालयात अनेक ठिकाणी सापळे लावूनही उंदीर त्यात सापडलेले नाहीत.