अनेक वेळा संधी देऊनही तीन आसनी रिक्षा, सहाआसनी रिक्षांचे परवाने नूतनीकरणाचा कालावधी संपला तरीही नूतनीकरणासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे आलेले नाहीत. त्यामुळे पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागाने परवाने नूतनीकरणासाठी १५ नोव्हेंबर ही अखेरची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर परवाने रद्द केले जातील असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
ही मुदत सरकारच्या परिवहन विभागाने अंतिम असल्याची जाहिरातबाजी प्रादेशिक परिवहन विभागाने पनवेल येथील कार्यालयात व परिसरात केली आहे.
काही रिक्षांचे परवाने कालबाह्य़ झाल्याने त्यांना नूतनीकरणासाठी हजारोंचा दंड भरवा लागणार आहे. या प्रक्रियेतून वाचण्यासाठी नवीन लॉटरी पद्धतीने परवाना योजनेमध्ये समाविष्ट होण्याच्या विचार रिक्षाचालकांनी केला आहे, त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने नूतनीकरणासाठी लाभार्थी न आल्यास संबंधित लाभार्थ्यांला परवाना लॉटरी योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे.