पनवेल : सिडको महामंडळाने मेट्रो मार्ग क्रमांक १ बेलापूर ते पेणधर या दरम्याच्या उन्नत पुलावर आणि मेट्रो स्थानकांवर खासगी व्यक्तींनी, संस्थांकडून मेट्रो प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे भित्तीपत्रके (पोस्टर) लावले आहेत. तसेच संदेशवहनाच्या तारा (कम्युनिकेशन वाहिनी) ओढल्या आहेत. त्यामुळे सिडको मंडळाने जाहीर सूचनेद्वारे या तारा व भित्तीपत्रके न काढल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको हद्दीत टीडीआर लागू होणार, ३० दिवसांत नागरिकांना हरकतींची मुभा 

police constable suspended for helping drug smuggler
अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी

मागील वर्षी १७ नोव्हेंबरपासून सिडकोने मेट्रो मार्ग क्र. १ वर प्रवासी वाहतूक सुरू केली. मात्र काही खासगी संस्थांकडून मेट्रो मार्गावरील पुलाचे विदृपीकरण केले जात आहे. यामुळे मेट्रो गाड्यांच्या परिचालनास व मेट्रो रेल्वेच्या बांधकामांस धोका निर्माण होत असल्याचे सिडको अधिका-यांच्या ध्यानात आल्यावर परवानगीशिवाय कोणतेही अनधिकृत फलकबाजी व तारा ओढल्यास मेट्रो रेल्वे (परिचालन व देखभाल अधिनियम, २००२), उपवाक्य क्र. ६२ (२) व ७८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिली. पुढील सात दिवसांत मेट्रो मार्गावरील अनधिकृत भित्तीपत्रके व संदेशवहन तारा स्वताहून न काढल्यास सिडको अशा संस्थांनी दोषी समजून त्यांच्याकडून मेट्रो रेल्वे (परिचालन व देखभाल अधिनियम, २००२), उपवाक्य क्र. ६२ (२) व ७८ नुसार दंड आकारणार आहे.