पनवेल: शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी पनवेल प्रांत कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले. पनवेल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कार्याध्यक्ष श्रुती म्हात्रे, युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, पनवेलच्या महिला अध्यक्ष निर्मला म्हात्रे, मल्लिनाथ गायकवाड, प्रीतेश शाहू, अरुण कुंभार, कांतीभाई गंगर, सुधीर मोरे, जोस जेम्स, चेतन म्हात्रे, अमित लोखंडे, आरती ठाकूर, कल्पेश गंगर, शाहीद मुल्ला व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पनवेल: अखेर अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी अत्यंत महत्त्वाचा घटक असला तरी शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत, कर्जमाफी दिली नसल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. शुक्रवारी पनवेलच्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करुन आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार अनिल जाधव यांना देण्यात आले.