पनवेल : मराठी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्राथमिक शाळेने तालुक्यातील २४० शाळांना स्पर्धेत मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला आहे. शासनाने राबविलेल्या शिक्षण व्यवस्थेमधील उपक्रम कोणती शाळा अचूक राबविते यासाठी केंद्र स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही स्पर्धा घेण्यात आली. विविध उपक्रमांची माहिती संकलित करुन शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या अॅपवर ही माहिती दिल्यानंतर पालिकेच्या शाळेने तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा पुढील टप्पा हा जिल्हास्तरीय असून त्यानंतर राज्य स्तरीय स्पर्धेसाठी पनवेलची शाळा निवडली जाईल का यासाठी पालिकेचे प्रयत्न सूरु आहेत.    

राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्र स्तरावर, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर ‘सुंदर शाळे’ची स्पर्धा आयोजित केली आहे. तीन दिवसांपूर्वी शासनाच्या शिक्षण विभागाच्या निरिक्षकांनी पनवेल शहरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक १ दिवगंत लोकनेते दि. बा. पाटील शाळेला भेट दिली. पाच एकर भूखंडावर तीन मजली इमारतीसाठी पनवेल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी १२ कोटी रुपये खर्च करुन ही शाळा बांधली आहे. शाळेचा परिसरात मोठा असल्याने येथे विविध उपक्रम राबविणे शिक्षक व विद्यार्थ्यांना शक्य होते. या शाळेत ३१३ विद्यार्थी पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतात. ३० हून अधिक वर्गखोल्या या शाळेच्या इमारतीमध्ये आहेत. आठ शिक्षकांनी शाळेची अचूक माहिती शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या अॅपवर लिहीली.

groom candidate women voters cast vote at polling station
वर्धा : मतदान केंद्रावर नवरदेव, उमेदवार, महिला मतदार; सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्साह, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
supreme court
केंद्र आणि राज्यात स्पर्धा चुकीची; कर्नाटकच्या केंद्रीय निधी याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?

हेही वाचा : मोबाईलवर आलेल्या जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात, आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक 

शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी केलेली स्वच्छतेची माहिती समाजमाध्यमांवर दर्शविली गेली. वर्गांची सजावट, पोषण आहाराअंतर्गत परसबागेतील फळबागेतील माहिती, वर्क्तुव स्पर्धेसारख्य विविध स्पर्धेच्या उपक्रमाची माहिती शिक्षकांनी मॉनिटर अॅपमध्ये अचूक दिल्याने तसेच शाळेतील सुशोभिकरण, विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी करुन घेतलेल्या उपक्रमांमुळे ही निवड झाली. आयुक्त देशमुख यांनी दिलेल्या माहितीनूसार पालिकेच्या शिक्षण विभागाचे काम पालिकेचे अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त गणेश शेटे, प्रशासन अधिकारी किर्ती महाजन, मुख्याध्यापिका अनुपमा डामरे, सरीता काकडे, विनिता तायडे, वैशाली सावळे, निलम देवळे, अर्चना माने, चंद्रकांत वारघुडे, जयश्री रोढे, वैशाली पाटील हे पाहत आहेत.