पनवेल : कामोठे येथे दोन दिवसांपूर्वी पारनेरवासियांच्या संवाद सभेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी एका ध्वनीफीतीव्दारे अहमदनगर जिल्ह्यात व पारनेर तालुक्यात प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांचे नाव न घेता लंके यांची दहशत असल्याचा आरोप केला होता. या वादग्रस्त ध्वनीफीतीमध्ये शिविगाळ आणि गोळ्या झाडण्याची धमकी डॉ. सुजय यांना देण्यात आल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले होते. या कथीत वादग्रस्त ध्वनीफीतीबद्दल महाविकास आघाडीचे डॉ. सुजय यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांनी मंगळवारी लोकसत्ताकडे दिलेल्या प्रतिक्रीयामध्ये कथीत ध्वनीफीत बनावट असून ज्या दोन व्यक्तींचे हे संभाषण आहे त्यांनी हा आवाज त्यांचा नसल्याचे म्हटले आहे. तसेच पाच वर्षे खासदारकी असताना विकासकामे न केल्याने एेन निवडणूकीत कोणताही मुद्दा हाती राहीला नसल्याने प्रचारासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र मुंबईस्थित पारनेरवासी सूज्ञ असून ते यावर योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रीया लंके यांनी दिली. 

हेही वाचा : धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Sharad Pawar On Eknath Khadse join Bjp
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “नाईलाजाने…”

रविवारी कामोठे येथील सभेमध्ये डॉ. सुजय यांनी नगर दक्षिण मतदारसंघातील दहशतीचा मुद्दा रहिवाशांसमोर उपस्थित केला होता. त्यावर लंके यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये पाच वर्षे खासदार पद असताना डॉ. सुजय यांनी कामोठेमध्ये राहणा-या पारनेरवासियांची का भेट घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला. केवळ निवडणूकीमध्ये मते पदरात पडावी म्हणून बनावट ध्वनीफीत एेकवून सहानुभूती मिळवली जात असल्याकडे लक्ष वेधले. या बनावट ध्वनीफीतीमध्ये निवृत्ती घाडगे यांनी ध्वनीफीतीमधील आवाज हा त्यांचा नसल्याचे म्हटले आहे. तसेच कळस गावचे माजी उपसरपंच गणेश काणे यांनी सुद्धा आपले आणि गाडगे यांचा या संदर्भात कोणताच संवाद झाला नसल्याचेही स्पष्ट केले. वारंवार या दोन्ही व्यक्तींची नावे घेऊन तसेच ही बनावट ध्वनीफीत सर्वांसमोर मांडल्यामुळे दोघांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उलट नगर जिल्ह्यात करोनाच्या साथरोगाने ग्रामस्थ त्रस्त असताना निलेश लंके प्रतिष्ठाण गावक-यांसाठी काम करत होते. त्यावेळी खासदार कुठे होते याचा खुलासा विरोधी गटाने करावा असेही लंके म्हणाले.