उरण : शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर रविवारी दुपारी ३ वाजता पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आठवड्याभरात पहिला अपघात झाला आहे. हे वाहन उरणच्या चिर्लेकडून मुंबईकडे जात असताना हा किरकोळ अपघात झाला आहे. पुलावर उरणच्या दिशेने १२ किलोमीटर अंतरावर एका वाहनाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाच्या मधल्या दुभाजकाला धडक दिली. हे वाहन एक महिला चालवीत होती. वाहनात एक पुरुष आणि एक लहान मूल होते. यावेळी तातडीने अपघात स्थळी मदत पोहचविण्यात आली आहे.

हेही वाचा : नवी मुंबईतील मंदिरांची स्वच्छता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातात वाहन चालक महिला किरकोळ जखमी झाली असून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नेले आहे. त्याचप्रमाणे अपघातस्थळी अग्निशमन दलाचे जवानही उपस्थित होते. “रविवारी दुपारी अटलसेतुवर किरकोळ अपघात झाला आहे. चिर्लेच्या दिशेने हे वाहन मुंबईला जात असताना हा अपघात झाला”, अशी माहिती माहिती न्हावा शेवा वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी दिली.