उरण : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने उरणमध्ये रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मिरवणुका, व्याख्याने यासह उरण शहरात प्रथमच १३ फूट खोल पाण्यात ध्वजारोहण करण्यात आले.  नौदलातील निवृत्त दहा माजी मरिन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सहभाग घेत तरण तलावामधील १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन करण्यात आले. ही संकल्पना उरणचे आ. महेश बालदी यांची होती.

यंदा स्वातंत्र्य दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून जल्लोषात साजरे करण्यात येत आहे. यासाठी, प्रत्येक भागात आगळय़ावेगळय़ा संकल्पना आखत नागरिक हा दिन साजरा करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून उरण शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात पाण्याखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी, माजी मरिन कमांडो यांच्या संकल्पनेतून सोहळा साजरा करताना तरण तलावामधील १३ फूट खोल पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन केले. रविवारी रात्री बारा वाजून एक मिनिटांनी हे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी, दहा कमांडोंनी सुमारे अर्धा तास पाण्याखाली ध्वजसंचलन केले.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही

हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी शेकडो रहिवाशांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला उरणमधील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्यांच्या संघटनांनी स्वातंत्र्यालढय़ातील चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा स्मारक ते उरण शहर अशी तिरंगा यात्रा काढली होती. त्यानंतर उरण शहरातून मिरवणूक काढून गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांना अभिवादन करण्यात आले. या मिरवणुकीत सीआयटीयूचे कामगार सहभागी झाले होते.

या वेळी कामगार नेते भूषण पाटील, रामचंद्र म्हात्रे व संजय ठाकूर यांनी नेतृत्व केले. तर स्वातंत्र्यदिनी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. तसेच उरण नगर परिषदेच्या वतीनेही विविध उपक्रम राबवून हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.