जगदीश तांडेल, लोकसत्ता

उरण : चीनमार्गे पाकिस्तानला आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी जहाजातून पाठविण्यात येणारे संगणक न्युमेरिकल कंट्रोलचे साहित्य संयुक्त कारवाईत न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. यामध्ये २२,१८० किलोग्रॅम वजनाची ही सामग्री चीनमधील तैयुआन मायिनग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनीने पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनीअरच्या नावाने पाठविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…

न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करीत कराचीकडे जाणारे एक संशयित व्यापारी जहाज कारवाई करण्यासाठी रोखले. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत जहाजावर आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे संगणक न्युमेरिकल कंट्रोलचे साहित्य आढळून आले. सुरक्षा यंत्रणांनी संरक्षण संशोधन आणि संस्थेमार्फत (डीआरडीओ)  या जप्त करण्यात आलेल्या सामग्रीची तपासणी केली.

हेही वाचा >>> सुनियोजित नवी मुंबईचे बकालीकरण? हिरवे पट्टे, पाणथळ जमिनी, सायकल ट्रॅक निवासी संकुलांसाठी आंदण?

 त्यानंतर पाकिस्तानच्या आण्विक उपक्रमांमध्ये क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी आणि निर्मितीमध्ये या सामग्रीचा वापर केला जात असल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या वापरासाठी लागणारे सीएनसी मशिन वासेनार व्यवस्था अंतर्गत येते. यामध्ये आंतरराष्ट्रीय शस्त्र नियंत्रण आणि लष्करी अनुप्रयोगासह वस्तूंचा प्रसार रोखणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये भारत सक्रिय आहे. संगणक न्युमेरिकल कंट्रोलच्या मशीनचा वापर याआधी उत्तर कोरियाने आपल्या अणु कार्यक्रमात केला असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सुरक्षा यंत्रणांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भारतीय संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देऊन सतर्क केले होते. त्यानंतरच सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून संगणक न्युमेरिकल कंट्रोलच्या मशीन जप्तीची कारवाई केली होती. चीनमधून पाकिस्तानला पाठविण्यात येणाऱ्या दुहेरी वापराच्या लष्करी दर्जाच्या वस्तू भारतीय बंदरात कारवाई करण्याची ही काही पहिली घटना नाही.

कॉसमॉस इंजिनीयिरग, या पाकिस्तानी संरक्षण पुरवठादार कंपनीवर २०२२ पासूनच लक्ष आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये चीन औद्योगिक ड्रायरच्या आच्छादनाखाली पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा पुरवठा करत होता. याशिवाय नागरी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी चीनने पाकिस्तानला मदत केली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : साखर खरेदी व्यवहारात ६० लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक 

पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या ऑटोक्लेव्हच्या जप्तीमुळे मात्र पाकिस्तान क्षेपणास्त्रांच्या बेकायदेशीर व्यापारात आणि मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचे (एमटीसीआर) उल्लंघन करत असल्याची भीती आणखीनच बळकट झाली असल्याचेही या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

 दरम्यान, या जहाजावर मिळालेल्या सीएनसी मशीन इटालियन कंपनीकडून तयार केल्या जातात. हे मशीन कॉम्प्यूटरद्वारे नियंत्रित केली जाते. या मशीनद्वारे कार्यक्षमता, सातत्य आणि अचूकतेची पातळी प्राप्त करता येते. या सीएनसी मशिन्स १९९६ च्या वासेनार यांच्या करारात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हा करार एक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणाली आहे. भारत हा या करारातील ४२ सदस्य देशांपैकी एक आहे.

क्षेपणास्त्र निर्मितीसाठी वापर?

या जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीन होते. डीआरडीओ पथकाद्वारेही जहाजावरील वस्तूंची तपासणी करण्यात आली. या सीएनसी यंत्राचा उपयोग पाकिस्तान क्षेपणास्त्र करण्यासाठी करणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. कराचीला जाणाऱ्या या जहाजाची माहिती गृप्तहेरांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली होती.  जहाजावरील सामग्री शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेडमधून लादण्यात आली होती.