नवी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध राऊत यांच्या फोटोला जोडे मारत ऐरोली येथे करण्यात आला.
हेही वाचा – उरण मध्ये दुष्काळात पाणी गळती, हेटवणे जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया




शिवसेनेच्या ऐरोली येथील मध्यवर्ती कार्यालय समोर राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. राऊत यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केल्यानंतर फोटोचा फ्लेक्स फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आला. राऊत एक दिवस असेच कर्माने कचऱ्याच्या डब्यात जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. यावेळी शिवसेना युवा अध्यक्ष मनीत चौघुलेसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.