मुंबई कृषि उत्पन्न फळ बाजारात सध्या कोकण, कर्नाटक हापुस आंबा दाखल होत आहे. मात्र कोकणातील हंगाम मे अखेरपर्यंत असून एपीएमसीत आता जुन्नर हापुस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात १ हजार ते १५०० बॉक्स आवक होत असून दोन ते अडीच डझनला ८०० ते १५००रुपये दर आहे.

हेही वाचा >>> मुलांच्या मागे आईचे नाव लावण्यासाठी कायदा करा: डॉ. भारती चव्हाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर्षी बाजारात कोकणचा हापुस अवकाळी पावसाने टप्याटप्याने दाखल न होता एकदम दाखल झाला.त्यामुळे हापुसाच्या ऐन हंगामात एप्रिल-मे मध्ये हापुस आवक रोडावली. जुन्नर हापुस दरवर्षी बाजारात मे अखेरपर्यंत येत असतो. सध्या बाजारात जुन्नर हापुस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. जुन्नर हापुस आंब्याला ही अवकाळी पावसाचा फटका बसल्याने यंदा केवळ ४०%उत्पादन असणार आहे. त्यामुळे हा हंगाम १५जूनपर्यंत महिनाभर सुरू असेल असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसी बाजारात सध्या एक हजार ते १५०० बॉक्स आवक झाली असून दोन ते अडीच डझनला ८००ते १५००रुपये दराने विक्री होत आहे.