६४० हेक्टर जमिनीवर प्रकल्प;  मूलभूत सुविधांसह रुग्णालय, पोलीस ठाणी आणि वाहनतळ उभारणीही

Navi Mumbai Municipality, Palm Beach Road, Traffic Jams , sion panvel highway, Due to concretization, navi mumbai news, marathi news, road construction in navi mumbai,
काँक्रीटीकरणामुळे ‘पामबीच’वर वाहतूककोंडी
Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

नवी मुंबई :  सिडकोने जेएनपीटी व सागरी सेतूमधील ६४० हेक्टर जमिनीवर लॉजिस्टिक पार्कचा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.  त्यासाठी लागणारी जमीन साडेबावीस टक्के योजनेअंर्तगत नुकसानभरपाई मोबदला देऊन संपादित केली जाणार आहे. यासाठी नऊ पॉकेटमधील ३८९ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या ठिकाणी सिडको वेअरहाऊस भूखंड तयार करणार असून त्यासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविध रस्ते, पाणी, वीज आणि रुग्णालय, पोलीस ठाणी, वाहनतळ तयार करणार आहे.

उरणच्या जेएनपीटी बंदरावरून दिवसाला हजारो कंटेनरची जलमार्गाने वाहतूक केली जात आहे. या बंदराचा आणखी विस्तार केला जाणार असल्याने ते देशातील सर्वात मोठे बंदर होणार आहे. बंदर विकासाच्या या कार्यक्रमाबरोबरच याच भागातील न्हावा शेवा गावाशेजारी शिवडी सागरी मार्गाची सुरुवात आणि अंत होणार आहे. २२ किलोमीटर लांबीचा हा मार्ग लवकरच पूर्ण होणार असून दक्षिण मुंबईतून २२ ते २५ मिनिटांत नवी मुंबई गाठणे शक्य होणार आहे. याच भागात रिलायन्स समूहाचा एसईझेड प्रकल्प आकार घेत आहे. जवाहरलाल नेहरू बंदराचा (जेएनपीटी) विस्तार आणि न्हावा शेवा शिवडी सागरी मार्ग प्रकल्प यामुळे उरणचे महत्त्व जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने त्यामुळे उरणला यानंतर एक वेगळे महत्त्व निर्माण होणार आहे.

जेएनपीटी बंदरातून दिवसागणिक जाणारे हजारो कंटेनर आणि त्या अनुंषंगाने होणारी कोट्यवधी रुपयांची परकीय गुंतवणूक यामुळे सिडकोने या क्षेत्रात भव्य असे एक लॉजिस्टिक पार्क उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ३८९ हेक्टर जमिनीवर निर्माण करण्यात येणाऱ्या या लॉजिस्टिक पार्कसाठी सिडको पायाभूत सुविधांवर एक हजार ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठी ६४० हेक्टर जमीन लागणार असून सिडकोच्या ताब्यात असलेल्या जमिनीबरोबरच काही जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याबरोबरच नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांप्रमाणे साडेबावीस टक्के योजनेअंर्तगत विकसित भूखंड दिले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.

विमानतळ प्रकल्पासाठी दहा गावांतील ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून हे पुनर्वसन पूर्ण झाले आहे.

‘पार्क’मध्ये रुग्णालयही

भव्य लॉजिस्टक पार्क मध्ये अनेक परकीय कंपन्यांचे गोडाऊन राहणार आहेत. अद्ययावत अशा लॉजिस्टिक पार्कमध्ये एका रुग्णालयाची निर्मितीदेखील केली जाणार आहे. सिडकोने नवी मुंबई शहर प्रकल्पाअंर्तगत या भागातील काही जमीन संपादित केली नाही. त्यामुळे ती नव्याने संपादित करावी लागणार आहे.