उरण : हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर उरणमधील अनेक ठिकाणी संततधार व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने सोमवारी रात्रीपासूनच हजेरी लावली. पावसामुळे उरण, पनवेल, नवघर पूल, फुंडे ते जेएनपीटी तसेच उरण शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. या मार्गावरील वाहनांना रस्त्यावरील पाण्याचा अंदाज घेत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे उरण पनवेल मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

सोमवारी रात्रीपासून संततधार व मध्ये मध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या उड्डाणपुलाखाली काही प्रमाणात पाणी साचले होते. त्याचप्रमाणे जेएनपीटी कामगार वसाहत ते फुंडे दरम्यानच्या मार्गावरही पाणी साचून एका बाजूने दुसऱ्या बाजूला वाहत होते. उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा गाव, वायू विद्युत प्रकल्प, कामगार वसाहत, सिडको कार्यालय, वीर वाजेकर महाविद्यालय तसेच नवघर फाटाजवळील रस्त्यावर पाणी भरले होते. या पावसामुळे उरण शहरातीलही नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. सुट्टी असूनही पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचा परिणाम जाणवत होता.

uran marathi news, gaon dev yatra
उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू
navi mumbai municipal corporation steps taken to prevent accidents at tandel maidan chowk in seawoods
वाहतूक बेटासह चौकाचे काँक्रीटीकरण; सीवूड्स येथील तांडेल मैदान चौकात अपघातापासून बचावासाठी महापालिकेचे पाऊल
theft of Rs 2 lakh from a showroom in Panvel
पनवेलमधील शोरुममध्ये पावणेदोन लाखांची चोरी
criminal case filed against former mayor in panvel
रेशनदूकानदाराला जाब विचारणाऱ्या माजी नगराध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल