scorecardresearch

Premium

आरोग्यासाठी पनवेलमध्ये उद्या ‘लोकसभा’

खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण तसेच मलेरियाचे रुग्ण वाढल्याने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर पनवेलमध्ये साथरोगावर नियंत्रणासाठी ‘लोकसभा’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Lok Sabha Panvel
आरोग्यासाठी पनवेलमध्ये उद्या 'लोकसभा' (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

पनवेल : पनवेलमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले असून १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू डेंग्यूने झाला आहे. तसेच ताप, खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण तसेच मलेरियाचे रुग्ण वाढल्याने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर पनवेलमध्ये साथरोगावर नियंत्रणासाठी ‘लोकसभा’ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘लोकसभे’ची पहिली बैठक गुरुवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये किटकजन्य आजारावर नियंत्रण व प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना तसेच जनजागृतीचे आयोजन लोकसभा या बैठकीत आरोग्य विभागाने करण्याच्या सूचना सर्व पालिकांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पनवेल पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

buldhana mns, marathi name boards on shops and establishments, name boards other than marathi, name boards removed in mns style
…अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने दुकानाच्या पाट्या उतरवू, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढेंचा इशारा
Talathi exam candidates check answer sheet tomorrow pune
तलाठी परीक्षेच्या उमेदवारांसाठी उद्यापासून उत्तरतालिका पाहण्याची सुविधा
heavy rains in Bhandara district after long hiatus rivers canals and lake are overflowing
भंडाऱ्यात पावसाचे दमदार पुनरागमन, वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ
Nipah_virus_in_kerala
निपाहबाधितांची संख्या वाढली, संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क; शाळा बंद, सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन

हेही वाचा – Talathi Exam Result : तलाठी भरती परीक्षा संपली, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या…

हेही वाचा – बाप्पाच्या अतिप्रिय मोदकाला महागाईची झळ, दरात प्रतिकिलो ५ ते १० टक्क्यांची वाढ

या बैठकीचे अध्यक्ष पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे असणार आहेत. खासगी वैद्यकीय व्यवसाय धारक, सर्व प्रयोगशाळा, ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, पालिकेचे शहर अभियंता संजय जगताप, आरोग्य विभाग, एमआयडीसीचे अधिकारी, उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश या बैठकीत असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lok sabha tomorrow in panvel for health issue ssb

First published on: 20-09-2023 at 15:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×