दिघा येथील ईश्वरनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार केला. विकासकुमार ब्रह्मदीन यादव असे (२३) या तरुणाचे नाव आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पीडित मुलगी दुपारी २च्या सुमारास घरात झोपली असताना आरोपी विकासकुमार घरात घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने संध्याकाळी याविषयी पालकांना सांगितले. त्यांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी तक्रार केली. त्यानुसार विकासकुमार यादव याच्यावर बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकाला अटक

नवी मुंबई : घरात आंघोळ करणाऱ्या विवाहितेला तिच्या स्नानगृहाच्या खिडकीतून चोरून पाहणाऱ्या दीक्षान्त विकास जोशी (२४) या तरुणाला रबाळे पोलिसांनी विनयभगांच्या गुन्ह्य़ाखाली अटक केली आहे. ऐरोली भागात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. या घटनेतील पीडित विवाहिता आणि आरोपी दीक्षान्त हे दोघेही ऐरोलीतील एकाच भागात राहतात. शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पीडित विवाहिता ही स्वत:च्या घरातील स्नानगृहात आंघोळ करत होती. त्याच वेळी दीक्षान्त हा प्रकार खिडकीतून चोरून पहात होता. त्याचदरम्यान पीडित विवाहितेच्या सासऱ्यांनी हा घृणास्पद प्रकार पाहिला आणि त्यांनी आरडाओरड केली. मात्र दीक्षान्त त्या ठिकाणावरून पळून गेला. या घटनेने लज्जीत झालेल्या पीडित विवाहितेने याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी दीक्षान्त जोशी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून शनिवारी त्याला अटक केली.

वडिलांकडून मुलीचा विनयभंग

ठाणे : उल्हासनगर परिसरात मराठा सेक्शन ४ मध्ये राहणाऱ्या एका सोळा वर्षीय मुलीचा तिच्या मानलेल्या वडिलांनीच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वडील मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून त्यानंतर तिचा विनयभंग करीत होते. वडिलांच्या या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दखल झाला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl living in digha complains of sexual harassment
First published on: 23-05-2017 at 03:36 IST