अतिक्रमण विभागामार्फत दररोजच्या कारवाईचा विसर का ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई-नवी मुंबई शहरात दोन वर्ष करोना काळातील संकटामुळे नियमांच्या चौकटीत दिवाळी साजरी करावी लागली.परंतु  आता निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येत असताना सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते. एकीकडे उत्साहात दिवाळी साजरी केली जात असताना दुसरीकडे बेकायदा फलकबाजीला ऊत आल्याचे चित्र पहायला मिळाले होते . परंतू दिवाळीच्या सुट्टीनंतर आज पहिल्या दिवशी शहरातील फलकबाजीवर कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरात पालिकेची परवानगी घेऊन व पालिकेने  निश्चित केलेल्या जागेतच फलक लावता येतात. परंतु  दिवाळीच्या उत्साहात शहरभर फलकबाजी  पाहायला मिळत होते. त्यावर आज कारवाई करत बहुतांश सर्वच विभागातील फलक हटवण्यात आले आहेत.

ऐन दिवाळीत शहरातील रेल्वेस्थानक परिसर,  मुख्य जागा ,चौक याठिकाणी बेकायदा फलक लावण्यात आले होते. शहरात फलक लावताना महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत तसेच मुख्यालयामार्फत जाहिरात परवाना घेणे अपेक्षित आहे. परंतु उत्साही कार्यकर्ते राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते  हवे तिथे विनापरवाना फलकबाजी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे दिवाळीच्या सणात शहराचे विद्रूपिकरण झाल्याचे चित्र होते. दिवाळीत शनिवार रविवार व सोमवार अशी सलग तीन दिवस  सुट्टी असल्याने या फलकबाजी करणारांचे फावले होते. देशपातळीवर नुकताच नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ व सुंदर शहराचा देशातील तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे.परंतु सध्या दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शहरात बॅनरबाजीला ऊत आला होता .त्यावर आज पालिका विभाग अधिकाऱ्यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरात दिवाळीच्या सणानिमित्त शुभेच्छा देणारे  फलक लावण्यात आले होते. शहरात लावण्यात आलेले विनापरवाना बॅनर्स हटवण्यात आले आहेत. पालिका अतिक्रमण विभाग व विभाग अधिकाऱ्यामार्फत दैनंदिन कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त परिमंडळ- १

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation taken against illegal hoardings in navi mumbai city zws
First published on: 27-10-2022 at 19:28 IST