नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सन २०२१-२२ वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना २७ हजार तसेच करार व तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना २१ हजार व आशा वर्कर यांना ११ हजार रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

यामध्ये महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी – कर्मचारी यांना २७ हजार सानुग्रह अनुदान दिले जात आहे. त्याचप्रमाणे किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना २१ हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम प्रदान केली जाणार आहे.

हेही वाचा : उरणच्या पश्चिम विभागातील उर्वरित जमिनीही सिडको संपादीत करणार

याशिवाय सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही करार पध्दतीवरील कर्मचा-यांप्रमाणे २१ हजार इतके सानुग्रह अनुदान त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.आयुक्तांनी सानुग्रह अनुदान वितरणाबाबत घेतलेल्या या कर्मचारी हिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी-कर्मचारी वृंदाकडून स्वागत करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई म्युनसिपल मजदूर युनियनचे रमाकांत पाटील यांनी दिली. यानंतर आता एनएमएमटी कर्मचाऱ्यांना किती अनुदान मिळणार याची उत्सुकता एनएमएमटी कर्माचाऱ्यांना लागली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai commissioner rajesh narvekar declared officers and employee get diwali bonus tmb 01
First published on: 12-10-2022 at 17:41 IST