नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सुनावणी घेण्यात आली. यावेळी २५५१ हरकती आल्या होत्या. प्रारूप प्रभागरचना करताना नियमांना फाटा दिला असून नैसर्गिक रस्ते, लोहमार्ग, शहरातील मूळ गावठाणे यांचे जाणीवपूर्वक तुकडे पाडण्यात आले असल्याचा आक्षेप अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी घेतला.
कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि पालिका निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेल्या सुनावणीत प्रशासनावर मनमानीचा आरोप करण्यात आला आहे. जाणीवपूर्वक चुकीच्या पध्दीताने प्रभागरचना केल्याचे आरोप अनेकांनी केले.
काही आक्षेप असे
जाणीवपूर्वक चुकीच्या पध्दतीने प्रभागरचान केली आहे. तुर्भे गावातील फक्त काही घरे व लोकसंख्या सानपाड्याला जोडली आहे. रस्ता, रेल्वेस्थानक ओलांडून सानपाडा गाव जोडले आहे. याच्यात आम्ही घेतलेल्या हरकतीनुसार बदल केला नाही तर तुर्भे गावातील १ हजार मतदार मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालणार आहेत.रामचंद्र घरत, माजी जिल्हाध्यक्ष भाजप
नेरुळ गावाचे दोन तुकडे करण्यात आले आहे. ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. हरकत घेतली असून बदल न केल्यास आंदोलन करण्यात येईल. गिरीश म्हात्रे, माजी नगरसेवक,नेरुळ
दिघा विभागात प्रभाग २ व ६ जोडताना प्रशासनाने मनमानी केली आहे. १४ गावे कशासाठी नवी मुंबईत घेतली. त्यासाठी शासनाने हजारो कोटी नवी मुंबईला दिले पाहिजेत. ठाणेकरांच्या सांगण्यावरुन प्रभागरचा करण्यात आली आहे. त्याला आमचा विरोध आहे. नवीन गवते, माजी नगरसेवक
तुर्भे भाग तोडला आहे. डोंगर, रस्ते सगळे ओलांडून १४ गावे नवी मुंबईत जोडली आहेत. हा निवव्ळ मूर्खपणा आहे. नवी मुंबईत १४ गावे हवी कशाला? नवी मुंबईच्या विकासाचा निधी १४ गावांना कशीसाठी? अमित मेढकर, माजी नगरसेवक