तळोजा वसाहतीमध्ये बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेच्या (एनएमएमटी) ५५ क्रमांकाच्या
बसला आग लागली. रेल्वे भूयारी मार्गाशेजारी बसमधून धूर बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी गाडी बाहेर पडण्यास सुरुवात केली. प्रवाशांची तारंबळ उडाली. वाहनचालकाने तातडीने बस रस्त्याकडेला लावल्याने प्रवासी सुरक्षित बाहेर पडू शकले.

हेही वाचा- भरदिवसा कार्यालयात घुसून बांधकाम व्यवसायिकाला सिने स्टाईलने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी आग विझविण्यासाठी लागणारी उपकरणे बसमध्ये त्यावेळी उपलब्ध नव्हते. अग्निशमन दलाच्या बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. यापूर्वीही बस आगारातून बाहेर काढताना वाहनचालक बसच्या ना दुरुस्तीच्या तक्रारी आगार नियंत्रकांकडे करतात. मात्र, चांगल्या बस सेवा एनएमएमटीच्या ताफ्यात नसल्याने असुरक्षित प्रवास वाहनचालक व प्रवाशांना करावा लागत आहे.