पाऊस लांबल्याने ऑक्टोबर हिट ही उशिरा सुरु झाली असून आठवडा भरापासून सुरू झालेल्या कडक उन्हात अंगाची काहिली होत आहे. ती शमविण्यासाठी उरणच्या बाजारात रसरशीत ताडगोळे आले आहेत. मात्र ताडगोळ्यांचे आगमन लांबल्याने त्याची किंमत दहा रुपयांना एक नग म्हणजे १२० डझन आहे. ताडगोळे महाग असले तरी त्याला मागणी असून आवक वाढल्यानंतर किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर; आदिवासी वाड्यांमध्ये भीतीचे वातावरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परतीचा पाऊस लांबला असला आणि वत्तावरणात गारवा होऊन धुके पडू लागले आहे. तर काही प्रमाणात थंडीत ही वाढ झाली आहे. असे असले तरी सोमवारी पुन्हा एकदा पावसाने वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे परतीचा पाऊस संपला का हा प्रश्न आहेच,मात्र मागील आठवडा भरापासून उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये पडणारे उन्ह सध्या नोव्हेंबर मध्ये ही पडू लागली आहेत. त्यामुळे दिवसभर उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली वाढू लागली आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे फळांचे मोसमाही ठरले आहेत. नैसर्गिक पाण्याने भरलं हे फळ चवीलाही गोड असून त्यामुळे शरीराला गारवा मिळतो.त्यानुसार ताडाच्या झाडावर येणारे ताडगोळे ही तयार झाल्याने त्याची विक्री बाजारात सुरू झाली आहे. ताडगोळ्याचा मोसम उशिरा सुरू झाल्याने व ताडाच्या उंच झाडावर चढणाऱ्याची संख्या ही कमी असल्याने ती उतरविण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे यावर्षी आगमनालाच ताडगोळ्याचा किमती वाढल्या असल्याची माहिती उरण मधील ताडगोळे विक्रेत्या सीताबाई यांनी दिली आहे.