संतोष जाधव,लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई- नियोजनबध्द शहराची शेखी मिरवणाऱ्या  नवी मुंबईत शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंग केलेल्या वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई वाहतूक विभागाच्यावतीने शहरात सर्वत्र गर्दीच्या रस्त्यावर किमान एका दिशेचा रस्ता वाहनांसाठी रिकामा राहील व वाहतूक सुरळीत होईल यासाठी सम विषम पार्किंगचे फलक लावले आहेत.परंतू शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहनांमुळे सम विषम क्रमांकाचे फलक फक्त नावापुरते उरले असून सम व विषम असे क्रमांकाचे पार्किंगसाठीचे फलक लावले आहेत त्याच  दोन्ही रस्त्यावर गाड्या पार्क केलेल्या पाहायला मिळतात. रस्त्याच्या एका बाजूला सम क्रमांक तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला विषम क्रमांकाचे फलक लावण्यात आले आहेत. पण गाड्यांची संख्या एवढी वाढली आहे की रस्त्याच्या दोन्ही दिशेला पार्किंगच्या गाड्या उभ्या असतात.त्यामुळे सम विषम पार्किंग फक्त नावापुरते उरले आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : ८५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ८ लाख रुपयांचे दागिने लंपास; सोशल मीडियाच्या मदतीने पोलिसाकडून आरोपीस अटक

नवी मुंबई शहर झपाट्याने विकसित झालेले शहर आहे. सिडकोने नियोजनबध्द वसवलेल्या शहराच्या पार्किंगच्या नियोजनाचा पुर्ण बटट्याबोळ झाल्याचे दिसत आहे. शहरातील सर्वच बेलापूर ते दिघा या उपनगरात सम विषम पार्किगसाठीचे फलक पाहायला मिळतात.परंतू वाहनांची संख्याच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की सम की विषम हे न बघता रस्त्यावर मिळेल तेथे गाड्या पार्क केल्या जात आहेत.  शहरात पार्किंगसाठी जागाच अपुऱ्या पडत असल्याने नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.  त्यामुळे गाड्या पार्क करायच्या तरी कुठे असा प्रश्न पडत असल्याची खंत  नागरीक व्यक्त करत आहेत.

नवी मुंबई शहरात वाशी ते बेलापूर या हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानके तसेच वाशी ते  ऐरोली या सर्वच रेल्वेस्थानकाच्या व उपनगरांच्या भागात गाड्या पार्क करायच्या तरी कुठे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पार्किंगसाठी ठेवलेले भूखंड शिल्लक आहेत तरी कुठे असा प्रश्न आहे. पालिकेने विकास आराखड्यात पार्किंगसाठी व विविध सामाजिक कारणासाठी राखीव ठेवलेले भूखंड विक्री करण्यास सुरवात सिडकोने केली .त्यामुळे पालिका व सिडकोचा समन्वयाचा भोंगळ कारभारामुळेच  शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला असून आगामी काळात जागा कमी वाहने झाली उदंड असे चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळजत आहे. वाशी ते कोपरी पामबीच मार्गावर दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न  अतिशय बिकट बनत चालला असून  बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगर लागताच रस्त्याच्या दुतर्फा पामबीच मार्गावर  पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.याठिकाणी वारंवार कारवाई करुनही पार्किंगचा प्रश्न जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे.तसेच शहराअंतर्गत पार्किंगचा पुरता बोजवारा उडत आहे.कार्यालयीन वेळाबरोबरच संध्याकाळच्यावेळीही घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना पार्किंग करायचे तरी कुठे असा प्रश्न सातत्याने पडत आहे. पार्किंग जागांपेक्षा गाड्या उदंड असे चित्र शहरात सर्वत्र दिसत आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : नववर्षानिमित्त रस्त्यावरच विक्रीसाठीची नवी वाहने वाहतूक विभागाने हटवली

नवी मुंबईचा क्विन नेकलेस असलेल्या पामबीच मार्ग हा वेगवान व देखणा मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.परंतू याच मार्गावर वाशी रेल्वे उड्डाणपुल सोडताच वाशी उपनगराला सुरुवात होते.या उपनगराच्या पहिल्याच  आरेंजा सिग्नलपासून  ते   कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते.त्यातच  सतरा प्लाझा परिसरात बेकायदा पार्किंगने वाहतूक व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा करुन टाकल्याचे चित्र आहे. या मार्गावर स्त्यावरच बेकायदा पार्किंग ही पालिकेची  व वाहतूक व डोकेदुखी ठरली आहे.शहरात “व्हॅले पार्किंगचा”   फंडा   सुरु असून  व्हॅले केलेल्या गाड्या सतरा प्लाझाच्या दुसऱ्या बाजुला लावल्या जातात. वाहतूक विभागामार्फत बेकायदा पार्किंगवर कारवाई केली जाते.परंतू त्यांनाही मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे सिडकोकडून पालिकेला पार्किंगसाठी मिळणाऱे भूखंड अद्याप लालफितीतच अडकले आहे. त्यामुळे शहरात पार्किंगबाबत ठोस उपाययोजना न झाल्यास नियोजित नवी मुंबई शहरात पार्किंग धोरणाचे तीन तेरा वाजतच राहणार असे चित्र आहे.

वाशीतील सतरा प्लाझासह शहरातील विविध मॉल व कमर्शिअल पार्कसमोर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत  असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे गाड्या पार्क करायच्या तरी कुठे असा यक्ष प्रश्न नागरीकांना सातत्याने भेडसावत आहेत.तर काही खाजगी आस्थापना पार्किंगबाबत हात वरत असल्याने रस्त्यावरच पार्किंग होत असल्याचे चित्र आहे.

नवी मुंबई शहर तस चांगला पण  पार्किंगच्या बोजवाऱ्याने वेशीला टांगले अशी स्थिती मुंबईसारखी नवी मुंबई शहराची होऊ लागली आहे.

नवी मुंबई शहरात बेकायदा पार्किंगबाबत सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सम विषम पार्किंग फलक लावले आहेत. बेकायदा पार्किंग करणाऱ्यांना एक दोन वेळा सांगूनही बेकायदा पार्किंग केले जात असेल तर त्यावर नियमानुसार कारवाई होणारच आहे.

तिरुपती काकडे ,उपायुक्त वाहतूक विभाग

गाड्या पार्क करायच्या तरी कुठे? सम विषम पार्किंग फक्त नावापुरते

घरातून दुचाकी किंवा चारचाकी गाडी बाहेर काढण्यापूर्वीच गाडी पार्किंग करायची कुठे हा प्रश्न डोक्यात येतो.नवी मुंबई शहर नियोजनबध्द शहर असले तरी पार्किंगच्या नियोजनाबाबत संबंधित आस्थापनांना उदासिनता आहे. पालिकेने पार्किंग प्लाझा तयार करावेत व सिडकोकडून पार्किंगसाठीचे आरक्षित भूखंड न विकता पार्किंगसाठी द्यावेत अशी  सामान्य नागरीक म्हणून अपेक्षा आहे.

 राजेंद्र पाटील, नागरीक,सीवूड्स

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odd even parking in navi mumbai only on paper zws
First published on: 03-01-2023 at 17:38 IST