नवी मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला असून मान्सून आठ दिवसा वर येऊन ठेपला असताना नवी मुंबई पालिका क्षेत्रातील मान्सून पूर्व कामे कासगतीने सुरू आहेत.  शहरात उशिराने अनेक ठिकाणी नाले सफाईची कामे महानगर पालिका प्रशासनाने करीत असल्याने  मे महिना संपत आला तरी केवळ ६०-७० टक्के नाले सफाई झालेली आहे. आज खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबईतील नाले सफाईची पाहणी केली.

वाशी , नेरूळ, सीबीडी येथील होल्डींग पॅान्डला त्यांनी भेट दिली असता येथे योग्य रित्या कामे होत नसल्याचे दिसून आले. उशीरा नाले सफाई हातात घेतल्याने जुनच्या पहिल्या आठवड्या पर्यंत संपूर्ण साफफाई होण्याची शक्यता कमी  आहे.  जोरदार पाऊस आल्यास नवी मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त नालेसफाईच्या नावाने महानगर पालिका अधिकारी वर्ग ठेकेदाराशी संगनमत करून हात ओले करीत असल्याने ही नालेसफाई नसून हात सफाई असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२९ कोटींचा निधी धारण तलाव (होल्डिंग पाँण्ड दुरुस्ती साफ सफाई साठी मंजूर झाले आहेत. सर्व परवानगी मिळाल्या आहे ही माहिती न्यायालयाला देऊन काम त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. मात्र जून उजाडत आला तरी कामाला सुरुवात नाही. असा दावाही विचारे यांनी केला. या वेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विठलं मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.