संत्र्याच्या पेटीतून १९८ किलो वजनाचे १ हजार ४७६ कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा शनिवारी मुंबई महसूल गुप्तचर संचालनालय ( डी आर आय) च्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत वाशी मध्ये जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> तळोजात हे चाललंय तरी काय? कारखानदारांकडून घेतला जातोय जल प्रदूषण करणाऱ्यांचा शोध

संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून १९८ किलो हाय प्युरिटी क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन आणि ९ किलो शुद्ध कोकेन जप्त केले.शनिवारी वाशी जवळ कारवाई करण्यात आली. आयात केलेल्या संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह चालकाला अटक करण्यात आली आहे.या अमली पदार्थांच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात१ हजार ४७६ कोटी रुपये असल्याचा दावा सुत्रांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> तळोजात हे चाललंय तरी काय? कारखानदारांकडून घेतला जातोय जल प्रदूषण करणाऱ्यांचा शोध

मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपये किंमतीच्या अमली पदार्थांच्या साठ्याची तस्करी केली जात असल्याची माहिती यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती.त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता.वाशीजवळ संशयित ट्रक येताच त्याला अडवण्यात आले. या संशयित ट्रकची तपासणी केली असता “व्हॅलेन्सिया संत्री घेऊन जाणाऱ्या कार्टनमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले . संत्र्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये लपवून ठेवण्यात आलेला १९८ किलो उच्च शुद्धता क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि १४७६ कोटी रुपयांचे ९ किलो उच्च शुद्धता कोकेनचा साठा जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी माल आयात करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे,” असे डीआयडीच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One thousand four hundred seventy six crore drug smuggling revealed through orange boxes amy
First published on: 01-10-2022 at 23:08 IST