लोकसत्ता टीम

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार आवारातील गाळा नंबर एफ १२९-१३०मधील सज्जा आणि पत्र्याचे शेड कोसळण्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. सदर सज्जा आणि शेडखाली कोसळल्याने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र या घटनेने पुन्हा बाजारातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा-उरणकरांची पाणी चिंता मिटली, रानसई धरण काठोकाठ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एपीएमसीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. कांदा बटाटा बाजारात काही इमारती आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट आहे. कांदा बटाटा बाजारातील बरेच गाळे जीर्ण झाले आहेत. मागील वर्षी कांदा बटाटा बाजारातील लिलावगृहाची कमान कोसळली होती. मात्र तरी देखील येथील धोकादायक इमारती खाली न करता त्यामध्येच व्यापार सुरू आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कांदा बटाटा बाजारातील गाळा नंबर एफ १२९-१३०मधील सज्जा आणि पत्र्याचे शेड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.