नवी मुंबई : मुंबई महाराष्ट्रात राहिली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे. स्थापनेपासून ते २०२२ पर्यंत मुंबईत शिवसेनेचाच आवाज होता. शिवसेनेशी वैचारिक मतभेद असू शकतात मात्र सध्या जे सुरू आहे ते जनतेला रचलेले नाही असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे विभागीय महिला अध्यक्ष तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केले आहे.

हेही वाचा >>> “…आणि म्हणूनच ही रावणाची औलाद”, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांची शिंदे गटावर टीका

हेही वाचा >>> “शिवसेना आणि बाळासाहेब हवेत, पण…”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे विभागीय महिला अध्यक्ष तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड या रविवारी संध्याकाळी एका कार्यक्रमानिमित्त नवी मुंबईतील दिघा येथे आल्या होत्या. त्यावेळी सद्य स्थितीतील राजकारणावर भाष्य करताना अप्रत्यक्ष रित्या एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की मी मुंबईत वाढले आहे. माझे वैयक्तिक विचार शिवसेनेच्या बाजूने असतील असे नाही, मात्र आज जी मुंबई टिकलेय ती बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे. १९६६ प ते २०२२ पर्यंत मुंबईत शिवसेनेचाच आवाज होता. दुर्दैवाने त्यांच्याच शिलेदाराने त्यांना हे दिवस दाखवले. पण लोकांना हे पटलेले नाही. शिवसेनेसोबत वैचारिक मतभेद जरूर असतील म्हणून कोणालाही शिवसेना हे नाव काढून घेण्याचा अधिकार नाही. प्रत्येक मराठी माणसाने आपल्याला शिवसेना परत मिळेल हे बघायला पाहिजे अशी प्रतिक्रिया ऋता आव्हाड यांनी व्यक्त केलेय.