नवी मुंबईत सर्वत्र पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात जनसंवाद त्यात विशेषतः युवकांशी संवाद साधला जात आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : उरणमधील वृद्धेची दागिन्यांसाठी हत्या; आरोपीला अहमदनगरमधून अटक

shivaji park dadar marathi news
शिवाजी पार्कमधील माती काढण्यात अडचणींचा डोंगर
Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
devendra fadnavis said maha vikas and india aghadi are break engine public do not trust
इंडिया आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन, देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली…..
Pune Airport s New Terminal still not open for public
अजित पवारांनी आधी सांगूनही पुणेकरांचे अखेर ‘एप्रिल फूल’! जाणून घ्या नेमके प्रकरण…

२ जानेवारी १९६१ पासून पोलीस स्थापना दिवस साजरा केला जातो. पहिल्या कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नवी मुंबईतही या निमित्ताने २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. याच “पोलीस रेजिंग” डे सप्ताह निमित्ताने आज (गुरुवारी) मानवसेवा माध्यमिक विद्यालय आणि जुनियर कॉलेज, महापे येथील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिवसाची थोडक्यात माहिती देऊन, सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड, अति मोबाईल वापराचा दुष्परिणाम, पोलीस हेल्पलाइन डायल ११२ कार्यप्रणाली बाबत माहिती देण्यात आली. तसेच दुर्दैवाने असे प्रसंग आलेच तर नेमके काय करायचे या विषयी मार्गदर्शन केले. या नंतर विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देत शंका निर्सन करण्यात आले. नमूद विषयांवरती योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले व उपस्थित विद्यार्थ्यांच्या या वेळी, संस्थाचालक नारायण डाऊरकर, कॉलेजचे प्राचार्य प्रकाश भोईर, शिक्षक आणि शिक्षकेत्तर वृंद आणि शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा- ‘स्वच्छ व सुशोभित शहराच्या अपेक्षापूर्तीसाठी झोकून देऊन कामाला लागा’; नवी मुंबई पालिका आयुक्तांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश

पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधून पोलीस आणि जनता विशेषतः विद्यार्थी युवक संवादा वर भर दिला जात आहे. काळानुसार गुन्हे पद्धत ही बदलली असून त्या बाबत अवगत करणे आणि गुन्ह्यांचे गांभीर्य पटवून देणे या सह पोलीस कामकाज बाबत ही माहिती दिली जात आहे. थेट संवाद होत असल्याने त्यांचे शंका निर्सन ही केले जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.