नवी मुंबई: श्रावण महिना सुरु होत असल्याने त्याच्या एक दोन दिवस आगोदर खवय्ये मांसाहारावर मनसोक्त ताव मारतात. मंगळवार पासून श्रावण सुरु होत असल्याने आज चिकन दुकानावर खवय्ये लोकांच्या रांगा दिसत आहेत. 

श्रावण महिन्यात हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असून अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात. त्यामुळे या महिन्यात मांसाहार केला जात नाही. 

आणखी वाचा-उरण: सिडकोचे द्रोणागिरी नोड असुविधांनी ग्रस्त; रस्त्याविना नागरिकांची परवड

त्यामुळे श्रावण सुरु होण्याच्या एक दिवस आगोदर अर्थात दीप अमावास्येला खवय्ये मांसाहारावर ताव मारतात. नवी मुंबईतही याच निमित्ताने सर्वच मांसाहार विक्री करणारे दुकाने चिकन दुकानासमोर सकाळ पासून मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यातच आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मांसाहार हाच बेत बहुतांश लोकांनी केला आहे. 

आणखी वाचा-नवी मुंबई : चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला, ७५ किलो टोमॅटोची चोरी; व्यापाऱ्याचे तब्बल सात हजार रुपयांचे नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपच्या मुंबईतील एका नेत्याने तर गटारी आमावस्या निमित्त कोंबडी वाटप करण्याचे पोस्टर आपल्या भागात लावले आहेत. त्याची टीकात्मक चर्चा काल पासून होत आहे. त्यातच तेलंगणा राज्यातील एक व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल होत असून त्यातील नेते मद्याची एक बाटली आणि कोंबडी भेट देत आहेत. भेट देणाऱ्याच्या मागील पोस्टर वर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा फोटोही दिसत आहे. आपल्या कडे असे नेते नाहीत याची खंत अनेकांनी व्यक्त केली तर अनेकांनी हे अयोग्य असल्याची टिकाही केली आहे.